logo

सोमवार - शुक्रवार 11:00 - 06:00
शनिवार 10:00 - 12:00 (रविवारी बंद राहील)

(02342) 225661 | 8459457407
manotejhospital@gmail.com

मनोतेज हॉस्पिटल एस.टी. स्टँड समोर,
मोरे नगर, इस्लामपूर - 415409

Welcome to मनोतेज हॉस्पिटल

मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्र


  • संगणिककृत बाह्यरुग्ण विभाग
  • सुसज्य आंतररुग्ण विभाग
  • मेंदूचा आलेख (Video E.E.G)
  • वैयक्तिक समुपदेशन
  • सामुहिक समुपदेशन
  • मॅरेज कौन्सिलिंग
  • डिमेंशिया केअर सेंटर
  • दारूबंदी केंद्र
Read More

समस्या व लक्षणे

चिंतारोग / काळजी रोग

या आजारात निद्रानाश होणे, रात्री झोपेत स्वप्न पडणे, शरीराला घाम येणे, छातीत धडधडणे, तोंडाला कोरड पडणे, झोप लागणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे हि लक्षणे आहेत.

मनोशारीरिक आजार

सर्व वैद्यकीय चाचण्या नॉर्मल असल्या तरी रुग्णास त्रास वाटत असतो, कितीही इलाज केला तरी रुग्णाला बरे वाटत नाही. छातीत दुखते, ओटीपोटात दुखते, कंबर दुखते, स्वतःला मोठा आजार आहे असे वाटते, डोके दुखते, हात-पाय वारंवार दुखतात.

उदासीनता / नैराश्य

या आजारात उदास होणे, एकाकी वाटणे, निराशा येणे, झोप व भूक कमी लागणे, वजन वाढणे व घटने, कामाबाबतीत निरुउत्साही होणे, जीवन निरर्थर वाटणे, आत्महत्येचा विचार येणे, आत्मविश्वास गमावणे अशी लक्षणे दिसून येतात.

फोबीया / भयगंड

या आजारातील रुग्णांना सामान्य गोष्टींची अति भीती वाटते. जसे पाळीव प्राण्यांची, बंद जागेची, उंचीची, विवाहाची, घाणीची, अनोळख्या व्यक्तीची, अंधाराची, गर्दीची भीती आढळून येते.

छिन्न मानस / दुभंगलेले व्यक्तिमत्व

या आजारामुळे विनाकारण भीती वाटणे, वेगवेगळ्या शंका घेणे, चारित्र्याबद्दल शंका घेणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, वेगवेगळे भास होणे, कानात आवाज ऐकू येणे, स्वतःशीच बडबड करणे, विनाकारण हसत / रडत राहणे, एकांतात बसून राहणे.

वृद्धांच्या समस्या (स्मृतिभंश)

म्हातारपणात विसरभोळेपणा, छोट्या-छोट्या गोष्टी किंवा घटना लवकर न आठवणे, वस्तू कुठे ठेवली आहे ती विसरणे, घरचा पत्ता विसरणे, उदास वाटणे किंवा स्वभावात बदल होणे, नातेवाईकांना न ओळखणे, जागा-वेळ याचे भान न राहणे इ. लक्षणे आढळतात.

मुलांच्या बौद्धिक समस्या

अभ्यासात मागे असणे, लक्ष न लागणे, बोलताना अडखळणे, हट्टीपणा करणे, अंथरुणात लघवी करणे, एकाजागी न थांबणे, मंदबुद्धी असणे, अभ्यासात एखादा विषय कच्चा असणे अशी लक्षणे असतात.

मॅरेज कौन्सलिंग

कौटुंबिक समस्या, वैवाहिक अडचणी, भांडण, चिडचिड अशा वैवाहिक नात्यातील समस्यावर समुपदेशन केले जाते.

डिमेंशिया केअर सेंटर

म्हणजे स्मृतिभ्रंश / विसरभोळेपणाचा आजार झालेल्या वृद्धांना सांभाळण्यासाठी आम्ही लवकरच सुरु करत आहोत.

Our Doctors

डॉ.राहुल भाऊसाहेब मोरे
M.B.B.S.,D.P.M.
मेंदू व मानसोपचार तज्ञ्
व्यसनमुक्ती तज्ञ्
लैगिक समस्या तज्ञ्
डॉ .सौ.सुजाता राहुल मोरे
M.B.B.S.,D.P.M.
मेंदू व मानसोपचार तज्ञ्
व्यसनमुक्ती तज्ञ्
सर्टिफाईड कौन्सिलर

व्यसनमुक्ती

30,000

Total Patients

2

Specialist Doctors

20

Years of Experience

30

Number Of Beds