जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते. मानसिक आजारांबद्दल गूढतेचे, भीतीचे, करणी-जारणमरण, इत्यादींचे वलय असते. सर्वसाधारण वैद्यकीय वर्तुळातही याबद्दल फार माहिती नसते. त्यामुळे पोटदुखी, कानदुखीकरता जसे आपण चटकन डॉक्टरकडे जातो तसे मानसिक आजाराबद्दल जात नाही. यावरचे वैद्यकीय उपचार म्हणजे विजेचे शॉक, मनोरुग्णालयात दाखल करणे, इत्यादी भीतीदायक कल्पना असतात. त्यामुळे मानसिक आजारांच्या बाबतीत वैद्यकीय सल्ला न घेता काही जण मांत्रिकाकडे जातात. घरातल्या वडीलधा-या प्रेमळ माणसाचे दुखणे ऐकून घेणे व धीर देत राहणे याने किरकोळ मानसिक दुखण्यांचा विसर पडतो. हा एक प्रकारचा समुपदेशन उपचारच आहे. मात्र गंभीर प्रकारच्या दुखण्यांत वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. वेळीच उपचार झाले तर इतर शारीरिक आजारांप्रमाणेच काही मानसिक रुग्णही बरे होऊ शकतात.
या आजारात निद्रानाश होणे, रात्री झोपेत स्वप्न पडणे, शरीराला घाम येणे, छातीत धडधडणे, तोंडाला कोरडे पडणे, झोप लागणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे हि लक्षणे आहेत.
सर्व वैद्यकीय चाचण्या नॉर्मल असल्या तरी रुग्णास त्रास वाटत असतो, कितीही इलाज केला तरी रुग्णाला बरे वाटत नाही. छातीत दुखते, ओटीपोटात दुखते, कंबर दुखते, स्वतःला मोठा आजार आहे असे वाटते, डोके दुखते, हात-पाय वारंवार दुखतात.
या आजारात उदास होणे, एकाकी वाटणे, निराशा येणे, झोप व भूक कमी लागणे, वजन वाढणे व घटने, कामाबाबतीत निरुउत्साही होणे, जीवन निरर्थर वाटणे, आत्महत्येचा विचार येणे, आत्मविश्वास गमावणे अशी लक्षणे दिसून येतात.
या आजारातील रुग्णांना सामान्य गोष्टींची अति भीती वाटते. जसे पाळीव प्राण्यांची, बंद जागेची, उंचीची, विवाहाची, घाणीची, अनोळख्या व्यक्तीची, अंधाराची, गर्दीची भीती आढळून येते.
या आजारामुळे विनाकारण भीती वाटणे, वेगवेगळ्या शंका घेणे, चारित्र्याबद्दल शंका घेणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, वेगवेगळे भास होणे, कानात आवाज ऐकू येणे, स्वतःशीच बडबड करणे, विनाकारण हसत / रडत राहणे, एकांतात बसून राहणे.
म्हातारपणात विसरभोळेपणा, छोट्या-छोट्या गोष्टी किंवा घटना लवकर न आठवणे, वस्तू कुठे ठेवली आहे ती विसरणे, घरचा पत्ता विसरणे, उदास वाटणे किंवा स्वभावात बदल होणे, नातेवाईकांना न ओळखणे, जागा-वेळ याचे भान न राहणे इ. लक्षणे आढळतात.
ताणतणाव हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. तणावामुळे पित्त वाढणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, दमा, रक्तदाब, मधुमेह इ. विकार होऊ शकतात. तसेच अति राग येणे, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, कशातच रस न वाटणे, सतत दु:खी रहाणे असे मानसिक त्रास होऊ शकतात.
झोप लागण्यात अडचणी येणे किंवा गाढ झोप न लागणे किंवा रात्रभर झोप झाल्यावरही ताजेतवाने न वाटणे, भयानक स्वप्ने पडणे किंवा झोपेत चालणे अशा प्रकारच्या तक्रारी असतात .
बऱ्याच व्यक्तींमध्ये जुनाट डोकेदुखीचा आजार असतो. उदा. पित्तामुळे, डोकेदुखी, (अर्धशिशी) मायग्रेन, मानसिक तणावामुळे डोकेदुखी इ. बऱ्याच दिवसांची अंगदुखी, मान व पाठदुखी, पोटदुखी, फिट्समुळे डोकेदुखी इ. त्रास होतो.
एखाद्या गोष्टीमुळे किंवा घटनेमुळे अतिशय जास्त मानसिक तणाव आल्याने ही लक्षणे उद्भवू शकतात. यावेळी एखादी घटना घडण्याच्या अगोदरच त्या घटनेच्या दुष्परिणामांची पराकोटीची कल्पना करून एखादी व्यक्ती अतिशय घाबरून जाते, अस्वस्थ होते. अश्या वेळी या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढतात, त्यांना अचानक दरदरून घाम फुटतो, स्वतःच्या जीवाला धोका आहे अशी कल्पनादेखील या व्यक्तींच्या मनामध्ये येऊ लागते. यालाच ‘ पॅनिक अटॅक ‘ असे म्हणतात.
अनिद्रा एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये झोपेची पुरेसी संधी आणि वेळ असूनही, झोप सुरू करण्यास किंवा राखण्यास कठिण होते.अनिद्रेमुळे लोकांची नियमित फलनिष्पत्ती कमी होते.अनिद्रा कोणत्याही वयाच्या आणि लिंगाच्या लोकांना प्रभावित करू शकते.तथापि, वयोवृद्ध लोक आणि स्त्रियांमध्ये प्रचलन अधिक सामान्य आहे.निद्रानाशामुळे दिवसभर झोपत असल्यासारखे जाणवते.
भ्रम हा निश्चितच रोग नाही आहे पण एक लक्षण आहे ज्यात व्यक्तीला काल्पनिक अनुभव येतात. एखादी व्यक्ती प्रत्यक्ष बाह्य उत्तेजनाशिवाय ऐकू शकतो,त्याला गंध येऊ शकतो, इतरांची जाणीव होऊ शकते किंवा इतर लोकांच्या उपस्थितीचा अनुभव येऊ शकतो. हे बऱ्याच मनोवैज्ञानिक आणि वैद्यकीय परिस्थितींशी निगडीत आहे, ज्यात डिमेंशिया आणि डिलिरियम चा समावेश होतो. भ्रम हा सहसा वयस्कर लोकांमध्ये अधिक बघायला मिळतो जो वाढत्या वयाचा एक भाग आहे.
थरथरणे म्हणजे स्नायूंच्या अनैच्छिक, तालबद्ध हालचाली होणे. हाताची थरथर ही हाताच्या स्नायूंच्या अनैच्छिक हालचालींमुळे होते (मनगट, बोट, अंगठा) याला कंपन होणारा हात असेही म्हणतात. या अवस्थेत वयस्कर व्यक्ती किंवा सर्व साधारण व्यक्तीला नेहमीचे काम नीट करणे त्रासदायक होते. हा एक विकार नसला तरी हा मेंदूच्या पेशीची हानी दर्शवू शकतो. हात थरथरणे ही साधारणपणे इशेंशियल ट्रेमर्स (चेतना संस्थेचा विकार) किंवा पार्किंसन रोगामुळे होते. हे दोन्हीही अनुवांशिक रोग आहेत.
वरवर निरोगी दिसणाऱ्या मुलांमध्ये अचानक झटका येणे, शरीराच्या वारंवार विचित्र हालचाली होण्यास फेफरे वा फिटस् येणे असे म्हणतात त्यास मज्जा किंवा चेतासंस्थेचा आजार असे म्हणतात. फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण राहते. मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर मूल बेशुद्ध पडते किंवा डोळे फिरवते. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो...